महाविद्यालयीन प्रवेश पद्धती
गोंडवाना विद्यापीठ हे डिजीटल विद्यापीठ असल्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया ही ऑनलाईन
पद्धतीने केली जाते. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश
महाविद्यालयातून करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यास व त्यात काही चुका आढळल्यास त्याची
सर्वस्वी जबाबदारी विद्यार्थ्याची राहिल.
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करावा व आवेदन पत्रासोबत नमूद केलेली कागदपत्रे किंवा
प्रमाणपत्रे जोडावीत. तसेच वेळोवेळी विद्यापीठाच्या दिलेल्या निर्देषानुसार प्रवेश पद्धती
राबविण्यात येईल.
प्रवेश प्रक्रियेची सूचना:
- माहितीपुस्तिका पूर्णपणे काळजीपूर्वक वाचन करावे आणि माहिती
पुस्तिकेतील मागील बाजूस जोडलेले प्रवेश अर्ज (इंग्रजी व मराठी), प्रतिज्ञापत्र (Affidavit) व
घोषणापत्र (Declaration) बिनचुक भरावे.
- आवेदन पत्रासोबत खालील नमूद केलेली कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे
जोडावीत:
- आवेदनपत्र (Admission Form), ऑनलाईन अद्यावत झाल्यानंतर हार्डकापीवर स्वतःची स्वाक्षरी
व पालकाची स्वाक्षरी प्रमाणपत्र जोडावीत.
- शाळा किंवा महाविद्यालय सोडल्याचे प्रमाणपत्र (T.C.) आणि त्याच्या दोन सत्यप्रत.
- गुणपत्रिका: 10 वी गुणपत्रिका (SSC Marksheet) आणि 12 वी गुणपत्रिका (HSC Marksheet)
यांच्या मूळप्रत आणि दोन सत्यप्रती.
- जात प्रमाणपत्र (Caste Certificate) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी.
- अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र (Handicapped Certificate).
- तहसिलदार यांच्या स्वाक्षरीचा उत्पन्नाचा दाखला (Income Certificate).
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण अथवा नागपूर विद्यापीठ या व्यतिरिक्त इतर बोर्ड किंवा
विद्यापीठातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे मूळ स्थलांतरण प्रमाणपत्र (Migration
Certificate) व त्याच्या दोन साक्षांकित सत्यप्रती प्रवेशाच्या वेळी देणे आवश्यक आहे.
- ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शिक्षण मंडळ अथवा गोंडवाना विद्यापीठ,
गडचिरोली याव्यतिरिक्त बोर्डाची किंवा विद्यापीठाची पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली असेल अशा
विद्यार्थ्यांना गोंडवाना विद्यापीठातून योग्यता प्रमाणपत्र (Eligibility Certificate) प्राप्त
करून दाखल करावे लागेल. त्याशिवाय प्रवेश निश्चित होणार नाही. अशा विद्यार्थ्यांना योग्यता
प्रमाणपत्राची (Eligibility Certificate) मूळ प्रत जोडणे आवश्यक आहे. त्या विद्यार्थ्यांना
प्रत्येक शैक्षणिक वर्षात 15 ऑक्टोबरपर्यंत विहीत शल्क रु. 100/- भरून कार्यवाही करावी लागेल.
- प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास महाविद्यालयीन प्रवेश समितीपुढे
स्वतः हजर रहावे लागेल.
- महाविद्यालयाकडून प्रवेश नाकारण्यात आल्यास आवेदनपत्रासोबत जोडलेली
प्रमाणपत्रे प्रवेश नाकारल्यानंतर पंधरा दिवसात परत करण्यात येतील.
- एका महाविद्यालयातून प्रवेश रद्द करून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश
घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यास विद्यापीठाचे कॉलेज बदली प्रमाणपत्र (Transfer Code Certificate)
सादर करणे अनिवार्य आहे.
- शिक्षणातखंड (Gap) असल्यास तहसीलदार यांचे स्वाक्षरीचे मूळ खंड
प्रमाणपत्र (Gap Certificate) जोडावे.
- प्राचार्य, प्राध्यापक व महाविद्यालयात येणारा पाहुणा व नागरिक याचा
आदर राखणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. यापासून दूर गेलेल्या विद्यार्थ्यांना कडक शासन
होईल.
- प्राध्यापक वर्गात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी वर्ग सोडता कामा नये.
- सभ्यता व शिष्टाचार यांचे कडक पालन करून संस्थेचा लौकिक वाढविण्याचे
कार्य विद्यार्थ्यांनी करावे.
- महाविद्यालयातून शुल्क व इतर दंड ताबडतोब भरणे अनिवार्य राहील.
- वह्या, पाठ्यपुस्तके व वर्गात आवश्यक असणारे शैक्षणिक साधन
विद्यार्थ्यांजवळ असलेच पाहिजे.
- वर्गातील अभ्यास, गृहपाठ परीक्षा इत्यादी बाबतीत विद्यार्थ्यांचे वर्तन
समाधानकारक असावे. विद्यापीठ परीक्षेकरीता विद्यार्थ्यांची पात्रता ठरवितांना ही बाब अवश्य
विचारात घेण्यात येईल.
- महाविद्यालयाची मालमत्ता विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वापरावी अशी
अपेक्षा आहे. महाविद्यालयाच्या मालमत्तेची हेतुपुरस्पर केलेली हानी किंवा दुरुपयोग याबद्दल
शिक्षा होईल. तसेच एखाद्या वर्गातील फळा (Black Board), पंखे व डेक्सबेंचची तोडफोड किंवा नुकसान
झाल्यास त्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांवर सामुहिकरित्या दंड आकारण्यात येईल. याची प्रवेशीत
विद्यार्थ्यांनी/पालकांनी नोंद घ्यावी.
- विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये संघटना स्थापन करता येणार नाही.
विद्यापीठाच्या कायदा तसेच अध्यादेशाच्या निर्देशानुसार परिषदे प्रतिनिधीची निवड करण्यात येईल.
विद्यापीठ प्रतिनिधी कार्यवाहीस संबंधित राहील.
- विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या स्थानिक पायात बदल झाल्यास
आवश्यक आहे.
- महाविद्यालयात मिळणाऱ्या कोणत्याही शिष्यवृत्तीसाठी आपण पात्र आहोत हे
ठरविण्याची जबाबदारी सर्वस्वी विद्यार्थ्यांची व पालकांची आहे. त्याचप्रमाणे त्यासाठी करावयाचे
अर्ज व आवश्यक कागदपत्रे वेळेवर देण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांची आहे.
- विद्यार्थ्यांना महाविद्यालय सोडल्याचे मूळ प्रमाणपत्र दिल्यानंतर सहा
महिन्याचे आता सबबीखाली महाविद्यालय सोडण्याचे डुप्लीकेट प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यानंतर रु.
200/- शुल्क भरून डुप्लीकेट प्रमाणपत्र मिळेल. मूळ प्रमाणपत्र हरविले वा त्यानंतर नष्ट झाले अशा
प्राचार्याची खात्री पटल्याशिवाय डुप्लीकेट टी.सी. मिळणार नाही.
- विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून प्राप्त झालेले ओळखपत्र स्वतःजवळ
बाळगावे. ओळखपत्र सोबत नसल्यास केव्हाही महाविद्यालयातून बाहेर काढले जाऊ शकते.
- विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या अशैक्षणिक चळवळीत व हिंसक कृतीत
(Non Academic and Violent Activities) भाग घेऊ नये.
- खालील बाबींवरून कोणत्याही विद्यार्थ्यांचे नाव महाविद्यालयातून काढून
टाकण्याचे किंवा त्यास शिक्षा करण्याचे अधिकार प्राचार्यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहे:
- कॉलेजचे देणे (College Dues) देण्यास असमर्थ ठरत असल्यास.
- शैक्षणिक प्रगती व उपस्थिती कमी पडत असल्यास.
- महाविद्यालयात प्रवेश घेता प्रत्येक (Identity Card) मिळेल.
विद्यार्थ्यांनी त्यावर स्वत:चा फोटो आणि प्राचार्याच्या सहीसाठी अर्ज करून कार्यात दाखल करावे.
ओळखपत्र हरवल्यास 50 रुपये कार्यालयात भरून नवीन ओळखपत्र मिळू शकेल. प्रवेश मिळल्यापासून पंधरा
दिवसाच्या आत ओळखपत्र तयार करून घेणे आवश्यक आहे. सप्टेंबरनंतर ओळखपत्र तयार केल्यास 100 रु.
दंड लागेल आणि डिसेंबर ते मार्चपर्यंत तयार केल्यास 200 रु. दंड लागेल.
- जन्मदिना निमित्त स्वेच्छेने सामुदायिक रुग्णालयात किंवा महाविद्यालय
स्वच्छता केंद्र येथे जाऊन रक्तदान करावे.
- विज्ञान विभागातील साहित्याची तोड झाल्यास किंवा झाल्यास संबंधित
प्रवेशित विद्यार्थ्याकडून सामुहिकरित्या दंड आकारण्यात येईल. याची प्रवेशित विद्यार्थ्यांनी
नोंद घ्यावी. (ह्या माहिती पुस्तिकेतील माहिती बदलविण्याचा किंवा वाढविण्याचा अधिकार
प्राचार्यांना राहील.)
- फर्निचरच्या मोडतोडीबाबत सर्व सामान्य दंड 25/- प्रत्येक
विद्यार्थ्यावर आकारण्यात येईल.
- महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या नियमांनुसार
प्रवेशाच्या 33% प्रवेश महिलांकरिता आरक्षित करण्यात येईल.
- महाविद्यालयाच्या होणाऱ्या प्रत्येक तासाला उपस्थित राहणे
विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे. किमान 75% उपस्थिती अनिवार्य आहे. 75% पेक्षा कमी उपस्थित असल्यास
महाविद्यालयातून विद्यार्थ्याच्या पालकांना कळविण्यात येईल.
- परवानगीशिवाय अनुपस्थितीत राहिल्यास प्रत्येक तासाला रु 5/- प्रमाणे
दंड आकारण्यात येईल.
- परवानगीशिवाय किंवा पूर्ण सूचनेशिवाय विद्यार्थी सतत एक महिना
अनुपस्थित राहिल्यास त्याचे नाव महाविद्यालयाच्या उपस्थिती पदावरून कमी करण्यात येईल. अशा
विद्यार्थ्यांना आवश्यक शुल्क भरूनच पुनः प्रवेशाची आवेदन करता येईल.
- महाविद्यालयात सर्व विभागाच्या चाचणी परिक्षा घेण्यात येतील. सदर
परिक्षा देणे विद्यार्थ्यांना अनिवार्य राहील. परीक्षा न दिल्यास प्रति पेपर रु. 20/- प्रमाणे
दंड आकारण्यात येईल. चाचणी परिक्षेत प्रत्येक विषयात किमान 25% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
- कार्यालय सोमवार ते शुक्रवार 7:30 ते 3:00 वाजेपर्यंत आणि शनिवारला
सकाळी 7:30 ते 12:30 या कालावधीत सुरु राहील.
- कला व विज्ञान (पदवी) विभागाचे वर्ग सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 यात
भरतील. वेळेत बदल करण्याचा सर्वस्वी अधिकार प्राचार्यकडे राहील.
- कला शाखेत (पदवी) अध्यापनाचे माध्यम मराठी तर विज्ञान शाखेत अध्यापनाचे
माध्यम इंग्रजी राहील.
- सर्व प्रकारच्या सवलती व शिष्यवृत्तीचे अर्ज दिलेल्या कालावधीत भरणे
आवश्यक आहे. विद्यापीठ परीक्षेबाबत विशेष सूचना गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा दोन टप्यात
घेतल्या जातात. प्रथम टप्पा सेमिस्टर 1, 3, 5 ये परीक्षा फार्म साधारणतः सप्टेंबर मध्ये भरले
जातात आणि दुसरा टप्पा सेमिस्टर 2, 4, 6 चे परीक्षा फार्म साधारणतः फेब्रुवारी मध्ये भरले
जातात. या संदर्भात वेळोवेळी महाविद्यालयाचे सूचना फलकावर सुचना लावली जातात.
- वरील बाबींमध्ये गंभीर स्वरूपाच्या गैरवर्तनाबद्दल दोषी ठरल्यास किंवा
अशाच प्रकारच्या गैरवर्तनाचा पाठपुरावा करीत असल्यास प्राचार्य अशा विद्यार्थ्याच्या पालकाला
सूचित करून त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून काढून टाकू शकतात. तसेच परीक्षार्थी म्हणून
पुढे होणाऱ्या विद्यापीठाच्या परीक्षेतून वंचित करू शकतात. याबाबत प्राचार्याचा निर्णय अंतिम
समजण्यात येईल.
- अनुच्छेद क्र. 2 उपरोक्त गैरवर्तनाच्या गुन्ह्याबद्दल महाविद्यालयातून
काढून टाकलेल्या किंवा बाहेर घालवलेल्या किंवा परीक्षेस अयोग्य ठरविलेल्या विद्यार्थ्यांना अन्य
महाविद्यालयात प्रवेश घेताना मागील प्राचार्याची (ज्यांनी अपात्र घोषित करण्याचा निर्णय दिला)
परवानगी घेणे आवश्यक राहील. तसेच, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून काढून टाकल्याचे सध्य जाणून
बुजून लपवले तर कार्यकारी समितीच्या शिस्तीच्या कार्यवाहीस पात्र ठरतील.
- रॅगिंग विरोधी अधिनियम अंतर्गत विद्याथ्र्यांनी रंगीन विरोधी
अधिनियमाची पायमल्ली केल्यास सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कडक कारवाई करण्यात येईल.
महाविद्यालयीन परिसरात रंगीन संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास त्याची चौकशी दोषीवर निलंबनाची
कठोर कार्यवाही करण्यात येईल.
- महिला तक्रार निवारण समिती: महाविद्यालयीन परिसरात महिला कर्मचारी व
विद्याथ्र्यांची छेडछाड खपवून घेतली जाणार नाही. संबंधित विद्यार्थ्यावर महिला तक्रार निवारण
समिती द्वारे पोलीस कार्यवाही करण्यात येईल.
- महाविद्यालयात कोणत्याही प्रकारे जातीय भेदभाव करण्यात येऊ नये. जातीय
भेदभाव करणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल.
विशेष सूचना आणि नियम
- महिला आणि इतर विशिष्ट श्रेण्यांसाठी आरक्षण, सरकारी नियमांनुसार.
- अँटी-रॅगिंग कायदे आणि लिंग भेदभाव धोरणांचे कठोर पालन.
- विद्यापीठाच्या निर्देशांचे आणि मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे
अनिवार्य आहे.